तुळजापूरात बेलवृक्षाने बहारणार पिंपळाखुर्द परिसार

बेलपाने टंचाई कायम स्वरुपी दूर करण्यासाठी भक्तांनी लावले बावीशे वृक्ष !
तुळजापूर दि.२०(क.वृ.):- हिंदू धर्मिय श्रावण मासात पुजाअर्चा करण्यासाठी तीन पाने असलेल्या बेलवृक्षाचे पाने वापरतात परंतु बेलवृक्ष मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने श्रावणात बेलपाने टंचाई जाणवु लागल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळाखुर्द येथील हभप महाराज व अन्य दोघांनी ही टंचाई दूर करण्याचा संकल्प करुन बावीशे बेल वृक्ष लावुन तो श्रावणातच पुर्ण केला,हिंन्दूधर्मियांचा पविञ महिना म्हणजे श्रावण मास या महिन्यात शंभुमहादेवाची पुजा तीन पान असलेले बेलपञ वाहुन करतात माञ बेलाची जुने व वय झाल्याने काही वाळून गेल्याने तर काही दुष्काळामुळे मोठ्या संखेने कमी झाल्याने श्रावण मासात बेलपञाचा प्रचंड तुटवडा जाणवु लागला होता या पार्श्वभूमीवर पिंपळा खुर्द येथील हभप समाधान महाराज व शंकर कदम विष्णू शिंदे यांनी या बेलपञ टंचाई वर मात करण्यासाठी पिंपळा खुर्द पंचक्रोषीत बेलाचे वृक्ष लावण्याचा संकल्प केला प्रथमता गावातील शंकर कदम यांनी शेकडो बेलवृक्ष स्वयस्फुर्तीने या उपक्रमास भेट दिली त्यानंतर धार्मिक वृत्ताचा लोकांनी यात वृक्ष भेट देवीन सहभाग घेतला.वकरुन बेलाचे वृक्ष आणुन श्रावण मासात १ ऑगस्ट 2020 प्रथमता महादेव मंदीर परिसरात लावले त्यानंतर शेतकऱ्यांनी बेलवृक्ष लावण्याची इछा वर्तवली असता पंचक्रोषीतील शेतकऱ्यांना बेल वृक्ष दिले.व त्यांनी आपआपल्या शेतात लावले हे वृक्ष लावताना प्रथम त्याची पुजाअर्चा केली व नंतर ते लावले यामुळे भविष्यात अडीच वर्षानंतर वृक्ष मोठे झाल्यानंतर ते वृक्ष उजवण्याची गरज नसल्याचे ग्रंयात म्हटलं आहे.
बावीशे बेल वृक्ष मंदीर परिसर शेतात रस्ता कड्याला लावली आहेत.या वृक्षांनी मुळ ही धरलेआहे.
आजपर्यत पिंपळाखुर्द येथे आठशे देवकुरुळी दोनशे धोञी ऐकशेपन्नास चव्हाणवाडी शंभर सुरतगाव शंभर वृक्ष असे ऐकुन साडेबाराशे बेलवृक्षाचे लावण केले आहे.
0 Comments