Hot Posts

6/recent/ticker-posts

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

 कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

 



पुणे दि.२८(क.वृ.):- कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची  कमतरता भासणार नाहीअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

बाणेर येथील पुणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसखासदार गिरीश बापटआमदार चंद्रकांत पाटीलमहापौर मुरलीधर मोहोळआ. सिद्धार्थ शिरोळेभिमराव तापकीरमाजी महापौर मुक्ता टिळकविभागीय आयुक्त सौरभ राव,  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसेजिल्हाधिकारी डॉ. राजेश  देशमुखपुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारपिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोना बाधित  रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधाऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजकमहानगर पालिकेचे अधिकारीलोकप्रतिनिधीसामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना याचा चांगला उपयोग होईल. आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणेसामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन  केले पाहिजे.  जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावेअसेही ते म्हणाले.  हे कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेअतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महानगर पालिकेला  प्रथम शुभेच्छा देतो. ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महानगरपालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावीअसेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अधिकारीवैद्यकिय अधिकारीकर्मचारीपरिसरातील नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments