कोरोनामुळे आपसिंगाबीटमध्ये सार्वजनिक गणेश स्थापना विना रक्तदानाने श्रीगणेशोत्सव साजरा

तुळजापूर दि.२६(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा बीट अंतर्गत असणाऱ्या आठ गावांन मध्ये कोरोना प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर श्री गणेशाची प्रतिष्ठापना न करता आपसिंगा बीट मधील कामठा येथे रक्तदान शिबीर घेवुन श्रीगणेशोत्सव साजरा केला.
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी आपसिंगा येथे ऐकतीस कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण मिळाल्याचा पार्श्वभूमीवर लगतचा कामठा काञी दिपकनगर,दिपकनगर तांडा मोर्डा ,बोरी ,बोरी तांडा तडवळा या गावांन मध्ये कोरोना प्रार्दुभाव वाढू नये म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पो. नि. हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शन खाली बीट अमलदार पो हेका आनंद गायकवाड पो ना कमलकिशोर राऊत यांनी या आठ गावात घरीच गणपती बसवावा व सार्वजनिक बसवू नये असे आवाहन करुन जनजागृती केल्याने आठ गावात ऐकही सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळानै श्रीगणेश प्रतिष्ठापना न करता कामठा ग्रामस्थांनी रक्तदान शिबीर घेवुन त्यात शंभर गणेशभक्तांनी रक्तदान करुन श्रीगणेशोत्सव साजरा केला.
या रक्तदान शिबीर यशस्वी ते साठी पंचायत समिती सदस्य शरद जमदाडे सरपंच बळीराम सांळुके उपसरपंच सरिता रोकडे माजी उपसरपंच संभाजी जमदाडे नेताजी जमदाडे महिला पोलिस पाटील जमदाडे डाँ सुरेश माळी नर्स श्रीमती घोडके अदि उपस्थितीत होते.
0 Comments