Hot Posts

6/recent/ticker-posts

जप्त वाळू साठ्याचा लिलाव

 जप्त वाळू साठ्याचा लिलाव 


पंढरपूर, दि.१४(क.वृ.):- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  142  ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू साठा उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे  5  लाख एक 25 हजार 400  रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी बुधवार  दिनांक 19  ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असेही उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.

सदर लिलावात भाग घेण्यासाठी  25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे  भरणे आवश्यक आहे. सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments