मोहम्मद अयाज यांचा 'रफी-स्वरनाद' सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर दि.८(क.वृ.): स्वर सम्राट स्व. मोहम्मद रफी यांची 40 व्या पुण्यतिथि निमीत्त महाराष्ट्रचा महागायक विजेता मोहम्मद संचालित भारतीय कला प्रसार अकँडमी तर्फे आदरांजली।म्हणून रफी स्वरनाद ध्वनि चित्रफीत तयार करण्यात आली यामधे पाच गाणी आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासुन हिंदी सिने संगीताचा पार्शगायनावर ज्यांनी आपले अधिराज्य गाजविले, त्या मधाळ आवाजाची मोहीनी सामान्य व सूज्ञ रसिकांच्या मनावर आजही कायम आहे. म रफी हे हिंदी पार्शगायनाचे एक विद्यापीठ. ह्या विद्यापीठातुन त्यांचे समकालीन महान गायीकांनीही बरेच काही शिकले याची प्रामाणिक कबुलीही त्यांनी दिली. मन्नाडे, किशोरकुमार, तलत महेमुद, मुकेश यांनी त्यांच्या "सबरंगी " आवाजावर विशेष प्रेम केले.
पार्श गायकांची दुसरी पिढी येसूदास, सुरेश वाडकर, एस पी बालसुब्रमणम, मोहम्मद अजीज, शब्बीरकुमार, महेंद्रकपूर यांनी रफी स्वर विद्यापीठातुन गायकीचा विशेष अभ्यास करुन सिने पार्श्वगायन सम्रृध केले. या नंतर ची पिढी सोनू निगम, शान, कुमारसानू, हरिहरन, उदित नारायण, ते महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज यांनी त्या अनोख्या स्वर- गंगेच्या प्रवाहातून बरीच गायकी उचलली. रफी स्वर विद्यापिठाचा प्रवाह हा अखंड वाहत राहील यात शंका नाही.
संगीत कला जगताचा हा अनभिषिक स्वर सम्राट स्वभावाने मात्र अवलिया होता. मितभाषी, निगर्वी, प्रसिध्दीभिमुख, व सर्वांसाठी मदतीचा हात पुढे करणारा दात्रृत्व गुणाने संपन्न होता अशा या मुशाफीरास ईश्वराने "एक रत्न " म्हणुन आम्हा कोट्यावधी भारतीय रसिकांना "भारत-रत्न " होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। मोहम्मद अयाज यांना आशा भोसले, उषा मंगेशकर, पंडित ह्यदयनाथ मंगेशकर, हेमलता, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, सारख्या दिग्गज कलाकारांनी प्रती रफी म्हणून गौरविले। रफी साहेबांची गाणी हुबेहुब सादर करुन मोहम्मद अयाज जगभरामधे सोलापूर चे नाव लौकिक केले...
0 Comments