Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवद्रोही कर्नाटक सरकारचा मराठा सेवा संघ सोलापूर वतीने जाहीर निषेध...

 शिवद्रोही कर्नाटक सरकारचा मराठा सेवा संघ सोलापूर वतीने जाहीर निषेध...

सोलापूर दि.९(क.वृ.): मौजे मणगुती ता चिक्कोडी जि बेळगाव येथील रितसर परवानगी घेऊन बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक शासनाने रात्री  अंधार करून उखडून टाकला. 
छत्रपती शिवाजी महाराज हे शककर्ते राजे होते, त्यांच्या स्वराज्यात सर्व जनता सुखी संपन्न होती अश्या आदर्शवत राजांचा पुतळा उखडण्याच दुर्दैवी घटनेचा निषेध मराठा सेवा संघ सोलापूरच्या वतीने  सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळयाजवळ कपाळावर काळया भिती लावून, शिवद्रोही कर्नाटक शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन भाऊ जाधव, राम गायकवाड, समिऊल्ला शेख, मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार, हसिब नदाफ, विष्णू गायकवाड, प्रकाश शिंदे, अक्षय बचूटे, सतिश कदम, राहूल साळूंके, जयंत मोरे, राम शिंदे, विक्रम जाधव, राजेंद्र काकडे, संभाजी पवार, आशिष चव्हाण, महेश गायकवाड, धैर्यशील कावळे, अतुल रणसिंग आदी शिवप्रेमी बांधव उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments