Hot Posts

6/recent/ticker-posts

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि.९(क.वृ.) :- जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी झटणारा, विकासकामांचा सातत्यानं पाठपुरावा करणारा धडाडीचा सहकारी आम्ही गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जुन्नर तालुक्यातल्या अनेक संस्था, संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे दशरथराव पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांचं निधन ही पक्षाची आणि तालुक्याची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना.

Reactions

Post a Comment

0 Comments