खाजगी डॉक्टरांनी कोरोना संशयित रूग्णांना स्वॅब घेण्यास पाठवावे
जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश जारी
सोलापूर, दि.७(क.वृ.): कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्ह्यात विविध उपाययोजना करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व डॉक्टरांनी फिव्हर ओपीडी, नोंदणीकृत खाजगी दवाखाने, डिस्पेन्सरी, ओपीडी किंवा वैद्यकीय व्यावसायिक यांनी सर्दी, ताप, खोकला, कोरोना सदृश्य किंवा आयएलआयचा रूग्ण आढळल्यास त्याला औषधोपचारासह स्वॅब कलेक्शन सेंटरवर पाठवून द्यावे. रूग्णाची माहिती संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या संशयित रूग्णांवर औषधोपचार करून त्यांना त्वरित स्वॅब घेण्यासाठी स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये पाठवावे. जेणेकरून त्या रूग्णांपासून संसर्ग टाळला जावू शकतो. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा रूग्णांचे स्वॅब यंत्रणेमार्फत घेऊन त्यांच्यावर उपचार करावेत. तहसीलदार यांनी तालुक्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना कोरोनाबाबच्या बाबी निदर्शनाला आणून द्याव्यात, असे या आदेशात नमूद केले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी आणि संपर्क क्रमांक
अ.क्रं. | तालुका आरोग्य अधिकारी नाव | तालुक्याचे नाव | मोबाईल | ईमेल |
1. | डॉ. दिगंबर गायकवाड | दक्षिण सोलापूर | 9049951472 | |
2. | डॉ. श्रीकांत कुलकर्णी | उत्तर सोलापूर | 9422460362 | |
3. | डॉ. अश्विन करजखेडे | अक्कलकोट | 9420492064 | |
4. | डॉ. अशोक ढगे | बार्शी | 9689350849 | |
5. | डॉ. शिवराज घोगरे | करमाळा | 9011036381 | |
6. | डॉ. रामचंद्र मोहिते | माळशिरस | 9822670398 | |
7. | डॉ. सीमा दोडमणी | सांगोला | 9881048431 | |
8. | डॉ.नंदकुमार शिंदे | मंगळवेढा | 9421908390 | |
9. | डॉ. अरूण पाथरूडकर | मोहोळ | 9403694070 | |
10. | डॉ. एकनाथ बोधले | पंढरपूर | 9420543098 | |
11. | डॉ. अमोल शिंदे | माढा | 9403153577 |
0 Comments