Hot Posts

6/recent/ticker-posts

रेशन दुकानदार यांचा बंदचा इशारा ग्राहकाचा अंगठा रद्द करूण स्वाताला विमा संरक्षणची व कमिशनची वाढ करण्याची मागणी

 रेशन दुकानदार यांचा बंदचा  इशारा  ग्राहकाचा अंगठा रद्द करूण स्वाताला विमा संरक्षणची व कमिशनची वाढ करण्याची  मागणी


कळंब दि.३१(क.वृ.):- कोरोना संसर्ग प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढले आहे या पाश्र्वभूमीवर धान्य देताना ग्राहकाचे अंगठे घेणे रद्द करावे दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे कळंब तालुक्यातील कोरोणा योद्धा म्हणून काम करणारे रास्त भाव दुकानदार व त्यांच्या मदतनीस यांना कोरोणा योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावा आणि प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्याचे वाटप करण्यात आलेले आहे त्याचे पुर्ण कमीशन बॅंक खातेवर जमा करण्यात यावी अशी मागणी कळंब तालुका रास्त भाव दुकान संघटनेच्या वतीने दि.३१ रोजी  पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार परविन पठाण  यांना निवेदन देऊन करण्यात  आले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की मागिल महिन्या प्रमाणे रास्त भाव दुकानदार यांच्या ठस्यानेच रेशन वाटपास परवानगी देण्यात यावी व रास्त भाव दुकानदार यांना कोरोणा पासुन बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कळंब तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे पुरवठा विभागाकडे केती आहे . जर या सर्व मागण्या मान्य न झाल्यास  सप्टेंबर महिण्यात  ना विलाजाने सर्व रास्त भाव दुकान संपावर जाणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर रवि तवले,दादा डोंगरे, विलास पिंगळे, रामराजे जगताप, माने, तानाजी गायकवाड, सतीश मते सह  आदी दुकानदार या वेळी  उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments