कोरोना नवराञोत्सव पार्श्वभूमीवर नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्राथमिक चर्चा



देवीमंदीर भक्तांसाठी शाषणाचे आदेश आल्यावर सर्व बाबींचा विचार करुन सर्वांना विश्वासात घेऊन खुले करण्याचा विचार -जिल्हाधिकारी दिवेगावकर
तुळजापूर दि.२६(क.वृ.):- उस्मानाबाद जिल्हाचे जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान नुतन अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवार दि.२६ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर कोविड सेंन्टर, सैनिक शाळा, सह विविध भागात जावुन तीन तास पाहणी केली.
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने विश्वस्त तथा तहसिलदार सौदागर तांदळे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे मुख्याधिकारी अशिष लोकरे प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे. पो नि हर्षवर्धन गवळी धार्मिक व्यवास्थापक सिध्देश्वर इंतुले अदि उपस्थितीत होते.
यावेळी विविध अधिकारी वर्गाची ओळख करुन घेऊन त्यांच्याशी कोरोना नवराञोत्सव पुर्वतयारी बाबतीत प्राथमिक चर्चा केली
यावेळी बोलताना म्हणाले कि शाषणाचा आदेश आल्यानंतर सर्व बाबींचा विचार करुन सर्वांना विश्वासात घेवुन मंदीर भाविकांन साठी खुले कधी करायाचा याचा निर्णय घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
मंदीर खुले करणे व नवराञोत्सव बाबतीत प्राथमिक चर्चा
नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना व नवराञउत्सव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीरात प्रदक्षिणा मार्ग छञपती शिवाजी दरवाजापाठीमागील मार्ग सह विविध भागांची जावुन पाहणी केली. मंदीर खुले केल्यावर सोशल डिस्टंन्स ठेवणे बाबत उपाययोजना तसेच धार्मिक विधी बाबत संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा केली. माञ कोरोना पार्श्वभूमीवर नियम मोडायाचे नाहीत शिस्त पालन करायाचे या उद्देशाने गर्भगृहात न जात सिंहगाभाऱ्यातुन देवीस हात जोडुन दर्शन घेतले.
श्रीतुळजाभवानी सैनिक शाळेस भेट देवुन क्रीडांगण व शाळेच्या इमारतीची पाहणी करुन व्यवस्थे बाबत समाधान व्यक्त केली.
श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळात जावुन तेथील श्रीगणेश मुर्तीचे दर्शन घेवुन भेट दिली. यावेळी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकारी सदस्य उपस्थितीत होते.
दोन्ही क्वारटांईन सेंन्टरला भेटी!
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शहरातील दोन्ही क्वारटांईन सेंन्टरला भेट देवुन आरोग्य व्यवस्था जेवन सोयी-सुविधा यांची पाहणी केली .तसेच यावेळी आरोग्य विभागास विविध सुचना दिल्या. यावेळी डॉ. माने, उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय आधिकारी डॉ. चंचला बोडके, डॉ. शिरसीकर, डॉ. वारुळ उपस्थितीत होते.
क्वारटांईन मंडळीना श्रीगणेशोत्सवात मिष्ठान वाटप उपक्रमाचे जिल्हाधिकारीकडून कौतुक.!
श्रीगणेशोत्सवात दहा दिवस क्वारटांईन मंडळींना दररोज एक गोड पदार्थ देण्याच्या उपक्रम आनंद कंदले मिञ मंडळाने केला सुरु असताना जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी त्यांच्या तुळजापूर दौऱ्या दरम्यान 124 भक्त निवास क्वारटांईन सेंन्टर येथे मोतीचूर लाडू वाटप करताना जिल्हाधिकारी आले असता त्यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले.
0 Comments