फिस माफ करा किंवा सवलत द्या

तुळजापूर दि.२८(क.वृ.):- कोरोनाचा पार्श्वभूमीवर श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अँडमिशन ट्युशन डव्हलपमेंट सह अन्य फिस माफ करावी किंवा त्या मध्ये सवलत देण्याची मागणी प्राचार्यांना निवेदन देवुन युवासेनेने केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे कि, तुळजापूर यांनी विध्यार्थांकडून अँडमिशन फिस मधील स्टेशनरी, ट्युशन व डेव्हलपमेंट सह अन्य फिस सध्याची पालकांची अर्थिक परिस्थिती कोरोना पार्श्वभूमीवर बेताची असल्याने व सर्व अर्थिक व्यवहार बंद असल्याने भरु शकत नाहीत तरी ती माफ करावी किंवा त्यात सवलत द्यावी अशी मागणी युवासेना विद्यार्थी सेना यांनी निवेदन देवुन केले. हे निवेदन युवासेना तालुकाध्यक्ष प्रतीक रोचकरी,
विकास भोसले, सागर इंगळे, ऋषी इंगळे, विक्रम नाईकवाडी, प्रसाद उंडरे, कृष्णा झाडपीडे, सुदर्शन चव्हाण, राज इंगळे,शुभम जगताप, अजीत तोडकरी,सुरज देवकर, प्रवीण शिंदे, राहुल काळे, शुभम कदम,सिद्धार्थ बोरगावकर,आकाश चव्हाण,संकेत पवार, कृष्णा चव्हाण अदिंनी दिले.
0 Comments