अकलूज उपप्रादेशिक परिवहनकडून शिबीराचे आयोजन

सोलापूर,दि.26:अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शिबीरासाठी येणाऱ्या अर्जदारांनी मास्कचा वापर करावा, विल्हेवाट लावण्याजोगे हातमोजे आणि सॅनिटायझर घेऊन यावे. शिबीरामध्ये एकमेकापासून सहा फुटाचे अंतर ठेवावे. पक्क्या परवान्याची चाचणी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनावर घेताना एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे शिबीर टेंभुर्णी शासकीय विश्रामगृह येथे 4 सप्टेंबर 2020 रोजी, सांगोला शासकीय विश्रामगृह-9 सप्टेंबर, करमाळा शासकीय विश्रामगृह-11 सप्टेंबर, माढा शासकीय विश्रामगृह-15 सप्टेंबर, कुर्डूवाडी शासकीय विश्रामगृह-18 सप्टेंबर, मोडनिंबमध्ये उपविभागीय अभियंता, सीना-माढा प्रकल्प उपविभाग-4 यांचे सांस्कृतिक भवन-22 सप्टेंबरला होणार आहे.
0 Comments