श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शंभु महादेव मंदीरांन सह इतर मंदीरांन मध्ये पुजारुपातील आकर्षक आरास!
तिर्थक्षेञी श्रावणाचा अखेरच्या टप्प्यात वातावरण धार्मिकमय !
महादेव मंदीरांन सह मंदीरात विविध पुजारुपातील आरांसाची मांडणीची धुम !
मंदीरे भाविकांन साठी बंद माञ भक्त मंडळीत उत्साह कमी नाही !
तुळजापूर दि.१०(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन परिसरात श्रावण मासाचा पार्श्वभूमीवर मंदीरे जरी भाविकांन प्रवेशा साठी बंद केले असले तरी मंदीरांन मध्ये पुजाअर्चा माञ नित्यनियमाने विधीवत केल्या जात आहेत .
यंदाचा श्रावण मासातील विशेष आकर्षण म्हणजे मंदीरे जरी भक्तांन साठी प्रवेशबंद असलेतरी शंभु महादेव मंदीरांन सह इतर मंदीरांन मध्ये देवतांचा गाभाऱ्यात आकर्षक असे पुजारुपात आकर्षक आरास केले जात असुन याचे फोटो पाहुन भक्त श्रावणातील देवदेवतांचा दर्शनांचा लाभ घेवुन दर्शन घडल्याचे मानुन घेत आहेत.
सध्या तिर्थक्षेञ तुळजापूर येथील पविञ असा मंकावती कुंड बारालिंगेश्वर सिंदफळ स्थित श्रीमुदगुलेश्वर श्री गोमुख तिर्थकुंडातील श्री काशीविश्वेश्वर बारालिंग भवानी शंकर या महादेव मंदिरांन मध्ये विधीवत पुजाअर्चा करुन तिसऱ्या सोमवारी आकर्षक आरास मांडले गेले होते तसेच जेजुरीचै स्थान असलेल्या श्रीखंडोबा मंदीरात खंडोबा मुर्तीस शंकर पार्वती अवतार देवुन आकर्षक पुजा मांडण्यात आल्या आहेत .
तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत असणाऱ्या असणाऱ्या विविध मंदीर मध्ये जावून तिसऱ्या सोमवारी मंहत वाकोजीबुवि यांनी सोवळ्यात पुजन केले गेले. यावेळी दुर्गश छञे अभिजीत कुतवळ तिरुपती वाघे सुजित छञे अदि उपस्थितीत होते.
आराधवाडी येथील युवकांनी श्री बाबा बारा ज्योतिर्लिंग यांची भिल, महादेव कथेच्या रूपात महापूजा मांडण्यात आली होती.
0 Comments