क्वारंटाईन मंडळींना दहा दिवस गोड पदिर्थांची मेजवानी

श्रीगणेशोत्सवात क्वारटांईन मंडळींना कंदले मिञमंडळा तर्फ गोड पदार्थांची मेजवानी
तुळजापूर दि.२२(क.वृ.):- विघ्नहर्ता श्रीगणेशोत्सव पार्श्वभूमीवर गणेशोत्वानिमित्त आनंद दादा कंदले मित्र मंडळ च्या वतीने तुळजापूर शहरातील क्वारटांईन सेंन्टर मध्ये असणाऱ्या कोरंटाईन मंडळी ना श्रीगणेशोत्सवात दहा दिवस दररोज गोड पदार्थ देऊन साजरा करण्याचा अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत राजयोगी पावणा-या गणपतीला मोतीचुर लाडू प्रसाद तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या दाखवून हा गोड पदार्थ क्वारटांईन मंडळीना वाटुन करण्यात आला
तुळजापूर मधील श्री सुवर्णेश्वर गणपतीला प्रसाद दाखून आज शहरातील 108 भक्त निवास, 124 भक्त निवास व ग्रामीण रुग्णालय येथील 300 नागरिकांना बुंदीचे लाडू देऊन सुरवात केली.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, डॉ होनमाने, आनंद कंदले,रत्नदीप भोसले, रणजित पाटील, राम जाधव, मिथुन पोफळे, अनिल पवार, दादा भोरे, सुरज गायकवाड, कुणाला रोंगे, सुलेमान शेख, ओंकार इगवे,व आनंद दादा कंदले मित्र मंडळ सहकारी उपस्थिती होते.
0 Comments