Hot Posts

6/recent/ticker-posts

वेळापूरच्या मंडल अधिकार्यावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

वेळापूरच्या मंडल अधिकार्यावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल


अकलूज दि.२४(क.वृ.): बेकायदेशिरपणे विकलेल्या जमिनीची नोंद सरकार दप्तरी होऊ नये यासाठी रितसर लेखी तक्रार घेऊन आलेल्या तक्रारदारास जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिल्या प्रकरणी वेळापूरचे मंडल अधिकारी विलास रणसुभे यांच्या विरोधात वेळापूर पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती आणि अनुसूचीत जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्ता मालोजी खुडे (वय ३५ वर्षे रा. गिरझणी) यांची निमगांव मगराचे येथे इनामी मिळालेली २८ एकर जमिन होती. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दत्ता खुडे हे ती जमिन कसत नव्हते. गत काही वर्षांपुर्वी त्यांचे जमिनीच्या सातबाऱ्यावरील नाव कमी करून बंडु पांडुरंग इंगळे रा. पिसेवाडी व त्यांचे वारस मधुकर बंडु इंगळे यांच्या नावे नोंद करण्यात आली. त्याबाबत दत्ता खुडे त्यांनी शासन दरबारी न्याय मागितलेला आहे. अशी परिस्थिती असताना मधुकर इंगळे यांनी सदर जमिन सुमन पाटील यांना दि. २-३-२०२० रोजी विकली. याची माहिती मिळताच दत्ता खुडे यांनी वेळापूर येथील मंडल अधिकारी यांच्याकडे जमिनीची नोंद न धरण्याबात तक्रार अर्ज दीला होता. 
त्यानंतर चौकशीसाठी मंडल अधिकारी विलास रणसुभे यांच्या कार्यालयात दत्ता खुडे, मारूती खुडे, विठ्ठल खुडे, विष्णु खुडे, केशव खुडे व तानाजी खुडे हे गेले असता मंडल अधिकारी विलास रणसुभे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून या सर्वांना तेथून हाकलून दिले असल्याचे खुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आमच्या तक्रारीची दखल न घेता आम्हास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दत्ता खुडे यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू हे करत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments