मुस्तफा शेख यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार

अकलुज दि.१९(क.वृ.): राज्य विद्युत मंडळाच्या महावितरण कंपनी कडून दिला जाणारा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार माळीनगर शाखा कार्यलयाच्या मुस्तफा शेख यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते अकलूज येथे प्रदान करण्यात आला. कोरोणा काळात वीज पुरवठा सुरळीत करणे. विना अपघात सेवा करणे , तांत्रिक समस्या त्वरित निरसन करणे इत्यादी कामांमध्ये उल्लेखनिय कार्य केल्यामुळे मुस्तफा शेख यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.पुरस्कार मिळाल्यानंतरअकलूज विभाग चे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी अकलूज उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता महेश निकम, माळीनगरचे शाखा अभियंता शशिकांत लोंढे आदी उपस्थित होते.
0 Comments