Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे मंत्री उदय सामंत व अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा

विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे मंत्री उदय सामंत व अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा


भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला (जगन्नाथ साठे)दि.२७(क.वृ.): कोरोनाच्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत असून राज्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. तसेचमहसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यां अमानुष मारहाण करण्यात आली. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणा असून अशा मंत्र्याना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उदय सामंत व अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या काळात राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने 2020-21  या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे, तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाचे सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले. परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेतील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे. अशी मागणी भाजपचे सांगोला  तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच उपरोक्त मागण्यांसाठी दिनांक 26ऑगस्ट रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली. परंतु असंवेदनशील मंत्र्यांनी भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर स्वतःच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या उपस्थितीत गोरगरीब विद्यार्थ्यांन अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणा असून अशा मंत्र्याना पदावर राहण्याचा अधिकार नाही. वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे. चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी  भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांणी निवेदनाद्वारे केली आहे. 

वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या काळात राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात देखील निवेदनात दिला आहे. सदरचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार सांगोला यांच्यामार्फत पाठविण्यात आले. यावेळी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, नगरसेवक आनंदा माने, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, आनंद फाटे, डॉ.मानस कमलापूरकर, संजय गव्हाणे, सुरेश इंगोले, सचिन केदार, सोयजीत केदार, दीपक केदार, गणेश केदार, रणजित पाटील, वसीम शेख आदी उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments