Hot Posts

6/recent/ticker-posts

16 ऑगस्ट रोजी वन नेशन रन वर्च्युअल मॅरेथॉन

 16 ऑगस्ट रोजी वन नेशन रन वर्च्युअल मॅरेथॉन

सोलापूर दि.८(क.वृ.):- सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी वन नेशन रन या वर्च्युअल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर रनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूरकरांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी गेल्या तीन वर्षापासून सोलापूर शहरात यशस्वीपणे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच लॉकडाऊन मध्ये आहेत. सोशल तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व व्यवहार होत आहेत. त्यामुळे रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी पहाटे 6.30 वाजता. वर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ किंवा जिथे असाल तिथे मोकळ्या रस्त्यावर, मैदानात वन नेशन रनच्या माध्यमातून मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा. या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेताना प्रारंभी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या www.solapurmarathon.com  या वेबसाईटवर ऑनलाईन  नोंदणी करणे आवश्यक आहे. दि. 13 ऑगस्ट 2020 पर्यत नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच जे स्पर्धक या वर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील त्यांनी शासनाने दिलेले सर्व नियम पाळावेत आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपण किती रनिंग केलो आहोत त्याचे रेकॉर्ड, डाटा आणि फोटो दि. 17 ऑगस्ट 2020 रोजीच्या सकाळी 11 वाजेपर्यत अपलोड करायचे आहे. मॅरेथॉनमध्ये 2,5,10,16,21,42 किंवा 50 किलोमिटर इतके सहभाग घेवू शकता. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्च्युअल मॅरेथॉनमध्ये देशभरातून असंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील धावपटूंनी मोठ्यासंख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments