Hot Posts

6/recent/ticker-posts

अंकोली येथील भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा निकाल ९७ टक्के

अंकोली येथील भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा निकाल ९७ टक्के

 


अंकोली दि.१६(क.वृ.):- येथील भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा निकाल ९७ टक्के लागला असुन कला शाखेचा ९६ तर विज्ञान शाखेचा शंभर टक्के लागला आहे.यामध्ये मुलींनीच आपली बाजी मारल्याचे दिसुन आले आहे.
अंकोली(ता.मोहोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असुन यामध्ये कला शाखेच्या ओंकार रामदास शिंदे यांने ६५० पैकी ५४२(८३%) गुण मिळवुन प्रथम, कु.  निकीता उत्तरेश्वर सोनवणे व कु.रोहीणी गजेंद्र रणदिवे या दोघींनी ५२०(८०%) गुण मिळवुन द्वितीय तर कु. प्राजक्ता बाबासाहेब पाटील हिने ५१२(७८%) गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या कु.लक्ष्मी नामदेव सलगर हिने ५१०(७८%) गुण मिळवुन प्रथम, कु. सोनाली मच्छींद्र साळुंखे हिने ५०३(७७%) गुण मिळवुन द्वितीय तर कु.भारती हनुमंत गुरव हिने ४९४ (७६%) गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल स्थानिक स्कुल कमेटीचे बाबासाहेब क्षीरसागर,सज्जन पवार, संग्रामसिंह पवार, सरपंच संदीप उर्फ काकासाहेब पवार,प्राचार्य दिलीप पाटील,पर्यवेक्षक अशोक अवघडे,विभाग प्रमुख महेश पाटील यांनी कौतुक केले.

Reactions

Post a Comment

0 Comments