Hot Posts

6/recent/ticker-posts

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल


कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल


२९ हजार व्यक्तींना अटक; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई दि.३(क.वृ.): लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच २९,६०७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ५२ हजार ०३८ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ३ जुलै या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९२ (८६१ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार ६९५
पोलिसांनी हातावर क्वारंटाईन शिक्का मारून विलगीकरणात पाठविलेल्या–७८४.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८६ हजार ३०६.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ६४
(मुंबईतील ३९ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ४०, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ३, ठाणे ३,  ठाणे ग्रामीण १ पोलीस व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना SRPF १ अधिकारी, उस्मानाबाद-१, नवी मुंबई SRPF-१)
कोरोना बाधित पोलीस – १११ पोलीस अधिकारी व ९२९ पोलीस कर्मचारी

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments