तुळजापुरात तरुण युवकांची गळफास लावुन आत्महत्या !
तुळजापुर दि.२६(क.वृ.): तुळजापुर शहरातील वेताळनगर मधील ऐका २२ वर्षीय युवकाने साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि25रोजी पहाटे उङडकिस आली.
सदरील युवकाचा आत्महत्या बाबतीत विविध चर्च ला उधाण आले असुन आत्महत्या कुठल्या कारणाने केली हे चौकशी अंती स्पष्ट होणार आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की तुळजापुर शहरातील वेताळ नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ डिगबंर अपराध वय वर्षे २२ या युवकाने आपल्या राहत्या घरी दि.२५ शनिवार रोजी राञी २ वाजण्याच्या सुमारास स्लँबचा कडीस साडीने घरात गळफास लावुन आत्महत्या केली.
या तरुणाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे कारन समजु शकले नाही या तरुणाचे कांही माहिन्यापुर्वी लग्न ही झाले होते.त्याच्या पश्छात पत्नी आई भाऊ बहीन असा परिवार आहे सदरील युवकाचा कुंटुंब सध्या बोलण्याचा मनस्थितीत नसल्याने त्यांच्या जबानी अंती या आत्महत्येचे गुढ उलगडणार आहे.
त्याच्या भावाच्या खबरीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली.मयत सोमनाथ अपराध यांच्या वर सकाळी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने.तुळजापुर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments