मक्यावर लष्करी आळ्या ; शेतकरी संकटात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 26, 2020

मक्यावर लष्करी आळ्या ; शेतकरी संकटात

मक्यावर लष्करी   आळ्या ; शेतकरी संकटात                 


निबंर्गी दि.२६(क.वृ.): दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील मंगल पांढरे यांच्या शेतातील अडीच एकर मक्यावर लष्करी आळ्याने घाला घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी काबाड कष्ट करून शेती पिकवत असताना लष्करी आळ्याने अडीच एकर मका फस्त  करीत असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे .कोरोनाच्या भितीने शेतकरी काय करावे , काय करू नये या विचारांच्या संकटात सापडला आहे. त्यात आणखीन भर म्हणजे शेतातील पिके दिवस-रात्र कष्ट करून ही शेतकरी नुकसानीत जात आहे .  सरकारने अशा शेतांचे लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आधार द्यावा .ही एक सरकारची कर्तव्य असून लवकर नुकसान भरपाई द्यावी असे सर्व शेतकरी बंधूंना वाटत असल्याचे निंबर्गीचे शेतकरी मंगल पांढरे व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages