Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्यासाठी दिलासादायक बातमी, त्या" दहाजनांचे अहवाल निगेटिव्ह- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले

सांगोला तालुक्यासाठी दिलासादायक बातमी, त्या" दहाजनांचे अहवाल निगेटिव्ह- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले


सांगोला (क.वृ.): मौजे कोळा ता. सांगोला येथील  एक पोलीस कर्मचारी यांचा कोराना चाचणी अहवाल मेडशिंगी येथील कोविड केअर  केंद्रामध्ये घेणेत आला होता, त्या व्यक्तीचा आज दिनांक 09/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल  निगेटिव्ह आला आहे.  सदर व्यक्ती हा पुणे बिनतारी संदेश विभागात कामकाजास असुन तो त्याचे आई वडीलांना भेटण्यासाठी मौजे कोळा ता. सांगोला येथे आला असताना त्यास त्रास जाणवु लागल्याने त्यास मेडशिंगी ता. सांगोला येथील कोविड केअर  केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करणेत आले होते. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी करणेत आली होती, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला, असुन नियमानुसार त्यांना दक्षता म्हणून घरात विलगीकरण करणेत येणार आहे. तसेच मौजे वाकीशिवणे ता. सांगोला  येथील एक महीला पॉझिटिव्ह असुन तिच्यावर मेडशिंगी कोविड केअर  केंद्रामध्ये उपचार चालु  आहेत. तसेच तिच्या high risk contacts मधील आठ व्यक्तींना मेडशिंगी ता. सांगोला येथील कोविड केअर  केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल  करणेत आलेले होते. उपचारादरम्यान त्यांची कोरोना चाचणी करणेत आलेली होती त्या सर्व आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन नियमानुसार संबंधित ८ जणांचे घरात विलगीकरण करणेत येणार आहे. तसेच मूळचा आलेगाव येथील रहिवासी व पोलीस मुख्यालयात कर्तव्यास असणारा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे होता. सदर  पोलीस कर्मचारी हा कोरोना बाधिताच्या संपर्कात असलेच्या संशयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे दाखल झालेला होता. सदर पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनाविषयक तपासणी घेतली असता सदर चाचणीमध्ये संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चाचणी निगेटीव्ह आलेली आहे.
 सांगोला तालुक्यात वाकीशिवणे आणि वाकीघेरडी येथे प्रतिबंधीत क्षेत्राचे आदेश अलहीदा लागु करणेत आलेले आहेत. सदर व्यक्तीचे संपर्कात आलेल्या व्यक्तींवर प्रशासन बारकाईन लक्ष ठेवुन असुन प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे. आवश्यकते नुसार  पुढील कार्यवाहीसाठी  प्रशासन सज्ज आहे.  त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही  अफवांवर  विश्वास  ठेवू  नये.   महत्वाचे कामकाजाशिवाय   घराबाहेर पडु नये. घराबाहेर जात असलेस मास्क वापरणे सक्तीचे आहे. बाहेर कोणत्याही वस्तु संर्पक केल्यास स्वत:चे हात सॅनीटाईझ करावेत, चेह-याला हात स्वच्छ धुतल्याशिवाय अथवा सॅनीटाईझ केल्याशिवाय लावु नये.  प्रशासनाने आतापर्यंत  दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे. अन्यथा मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहाल अशी माहिती उप विभागीय अधिकारी, मंगळवेढा श्री. उदयसिंह भोसले यानी दिलेली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments