अकलूज( प्रतिनिधी) अकलूज येथील देवडीकर मेडिकल सेंटर मधून अकलूजचा पहिला कोरोना पॉझिटिव निमोनियाचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी सदर रुग्णावरती हॉस्पिटलचे डॉ. श्रीकांत देवडीकर डॉ. मानसी देवडीकर यांचेसह सर्व नर्सिंग स्टाफने पुष्प फुलांची उधळण करून रूग्णाला घरी सोडण्यात आले.
दिनांक ३ जुलै रोजीच्या रात्री अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातून (एसडीएच) मधून सदर रुग्णाला पुढील उपचारासाठी देवडीकर कोविड हेल्थ सेंटरमध्ये आयसीयू उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दिनांक १५ जुलै रोजी रुग्णावरती उपचार पूर्ण होऊन रुग्ण पूर्णपणे बरा झाला. सदर रुग्णाला स्वतंत्र आयसीयूमध्ये उपचार चालू होते. त्यासाठी सर्व उपचार पद्धत प्रोटोकॉल प्रमाणे काळजीपूर्वक करण्यात आले. रुग्णाला स्वतंत्र आयसोलेशन झोन असून संबंधित वेगळा नर्सिंग स्टाफ देखिल आयसोलेशन प्रतिबंधित कक्षामध्ये आहे. हॉस्पिटल मधील इतर आवार पूर्णपणे सॅनिटाईज आहे व इतर सर्व सोयी सुरक्षितरित्या सुरू आहेत.
अखंड जगात कोरोनाने कहर करीत थैमान घातले असून कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. अशातच आपले शासन-प्रशासन, डॉक्टर यंत्रणा, पोलिस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, स्वतःच्या जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. माळशिरस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होताच अकलुज मधील काही हॉस्पिटल covid-19 सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यापैकी एक देवडीकर मेडिकल सेंटर आहे. अकलुज मधील पहिला कोरना पॉझिटिव्ह रुग्ण बरा झाल्यामुळे डॉ. श्रीकांत देवडीकर,डॉ. मानसी देवडीकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर यामध्ये प्रांत अधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, मेडिकल सुपररीडेंटेड, डॉ. सुप्रिया खडतडे, डॉ. संतोष खडतडे, नोडल ऑफिसर, डॉ. प्रवीण शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते व डॉ. श्रेनिक शहा यांचे सहकार्य लाभले आहे.
0 Comments