Hot Posts

6/recent/ticker-posts

राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांची मागणी

राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांची मागणी 


अकलूज(क.वृ.) विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला असुन सदर घटना गंभीर आहे तरी यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करणेची मागणी डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे ईमेलद्वारे केली आहे. विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठया प्रमाणात  नुकसान केले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान पवित्र ऐतिहासिक वास्तू असुन समस्त भारतीय जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज हजारो लोक राजगृहाला भेटी देतात.
राजगृह हि महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्शाने पावन झालेली ऐतीहासीक वारसा असलेली  वास्तु (हेरिटेज) असुन समस्त भारतीयांची अस्मिता असलेल्या वास्तुवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तातडीने तपास करून यातील  समाजकंटकावर कठोर कारवाई करावी असे निवेदन 
डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments