ऋषिकेश माळी सी .बी. एस. इ.बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

ऋषिकेश माळी सी .बी. एस. इ.बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम

ऋषिकेश माळी   सी .बी. एस. इ.बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम


सांगोला (प्रतिनिधी) बऱ्याच प्रतिक्षेनंतर  सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून  सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.  या परीक्षेत सांगोला येथील प्रगतिशील बागायतदार जयवंत माळी यांचे चिरंजीव ऋषिकेश माळी यांनी 87.6 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला  आहे.
     त्याच्या या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी त्यांच्या आईवडिलांनी त्याला पेढा भरवून आनंद व्यक्त केला.या वेळी त्याचे कौतुक करताना वडील जयवंत माळी, आई शोभा माळी आजी मालन माळी, मेहुणे प्रा डॉ मुकुंद माळी, सिद्धेश्वर गिरमे, बहिणी रेश्मा माळी, वृषाली गिरमे,उपस्थित होते.
या वेळी ऋषिकेश माळी यांनी आपण सी बी एस इ परीक्षेत यश मिळविण्यासाठी आठ तास दररोज अभ्यास केला असून येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षा देवून प्रशासकीय सेवेत सेवा बजावणार असलंयाचे सांगितले.या वेळी सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन के एस माळी, उद्योजग उत्तम माळी, सक्सेस क्लासेसचे मयूर महामुनी, समता परिषदेचे मधुकर माळी, पतंजली योग समितीच्या जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा माळी,प्रगतिशील बागायतदार सावता माळी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
   ऋषिकेश माळी यास मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले व शाळेच्या प्राचार्या समीरा फर्नांडिस यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages