कोळा व बलवडी येथील अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह-- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2020

कोळा व बलवडी येथील अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह-- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले

कोळा व बलवडी येथील अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह-- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले 


सांगोला(प्रतिनिधी)  दिनांक 11 जुलै रोजी कोळा येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेच्या निकट संपर्कात आलेली हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील कोळा येथील तीन आणि बलवडी येथील नऊ अशा एकूण 12 जणांचे कोरोना चाचणी स्वॅब सांगोला कोविड सेंटर येथे 12 जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी अकरा जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व 11 अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.      

         उर्वरित कोळा येथील एक जणांचा कोरोना अहवाल प्रलंबित आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल डिस्टन्स चा वापर करावा, जास्तीत जास्त लोकांचा संपर्क टाळावा ,सुरक्षितराहावे, आणि अत्यावश्यक काम असेल तर घराच्या बाहेर पडावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी नागरिकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages