Hot Posts

6/recent/ticker-posts

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्तेज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्तेज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत





पुणे, दि.२५(क.वृ.):- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या  ‘भरोसा सेल’ मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्याचाही प्रयत्न केला जाणार असलयाचे सांगून जिल्हयातील गणेशोत्सव तसेच बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments