कोळा येथे दुसरा कोरोना रुग्ण सापडूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
कोळा (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील कोळा येथे 11 जुलै रोजी एक वयस्कर महिला कोरोना बाधित आढळून आली होती. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असून त्या महिलेच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या बारा व्यक्तींचा अहवाल तपासण्यात आले होते, त्यापैकी 11 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल 14 जुलै रोजी निगेटिव्ह आले असून उर्वरित एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आज 16 जुलै रोजी सकाळी पॉझिटिव आला आहे. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये कोळा गावांमध्ये दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे, तरीही गाव पातळीवरील ग्रामसमिती,अगर आरोग्य किंवा महसूल प्रशासनाच्या वतीने येथे कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई केलेली दिसून येत नाही. तसेच प्रशासनाच्यावतीने गावांमध्ये साखळी पद्धतीने रुग्ण वाढू नये यासाठी अद्यापही गाव बंद,कंटेन्मेंट झोन अथवा गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. कोळा गावातील नागरिकांना गावामध्ये दोन रुग्ण सापडुन ही याचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. गावातील नागरिकांचा चौकामध्ये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून विना मास्क चा वावर सुरू आहे.या सर्व बाबींकडे सांगोला प्रशासन लक्ष देणार? का असा सुर सर्वसामान्यांमधून निघत आहे.
0 Comments