बारावीच्या परीक्षेत नाझरा विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे घवघवीत यश वाणिज्य शाखेचा निकाल 100%
नाझरा (वार्ताहर ):- फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजने उज्वल यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. तिन्ही शाखेचा मिळून नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज चा निकाल 97.65 % लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल 100 % लागला आहे.शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे शास्त्र- ९७.९५%,कला- ९५.७४% असून शाखा निहाय गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी
शास्त्र शाखा
*प्रथम*- कुमारी बाबर साक्षी सतीश ७९.२३ %
*द्वितीय*- कुमारी विटेकर मयुरी संभाजी ७६.७७%
*तृतीय*- कुमार सरगर विष्णू भीमराव ७४.६२%
कला शाखा
*प्रथम*- कुमारी वाघमारे प्रतीक्षा बबन ८४.०० %
*द्वितीय*- कुमारी भोसले मोनाली बापू ८०.९२%
*तृतीय*- कुमारी वाघमारे गौरी बाबासाहेब ७९.६९%
वाणिज्य शाखा
*प्रथम*- कुमारी बंडगर कोमल रामहरी ८१.३८%
*द्वितीय*- कुमार वाघमारे उमेश बाळू ८०.७७%
*तृतीय*- कुमार पाटील करण सिद्धेश्वर ७९.२३% वरील प्रमाणे आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, यांनी अभिनंदन केले. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामीण भागात अग्रेसर असणाऱ्या नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले.
शाखा निहाय प्रथम क्रमांकाचे फोटो पाठवत आहे.
१) साक्षी सतीश बाबर ( विज्ञान शाखा)
२) वाघमारे प्रतीक्षा बबन (कला शाखा)
३) बंडगर कोमल रामहरी (वाणिज्य शाखा)
0 Comments