Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतसहभागाचे शेतकऱ्यांना आवाहन




सोलापूर, दि. 11 : प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षाकरिता जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पिक विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पीक विमा राबविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स  कंपनीची नियुक्ती केली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

पीक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे-
  1. सदरची योजना  अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
  2. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
  3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
पिक निहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान
अ.क्र.
पिके
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता
खरीप हंगाम
रब्बी हंगाम
1.
अन्नधान्य व गळीत धान्य पिके
विमा संरक्षित रक्कमेच्या 2 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते
विमा संरक्षित रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर टक्के किया वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते
2.
नगदी पिके
(कापूस व कांदा)

विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर टक्के किंवा वास्तवदर्शी दर  ते यापैकी जे कमी असेल ते
विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर टक्के किया वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते

योजनेचे वेळापत्रक :- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असेल.
अ.क्र.
बाब
खरीप
रब्बी
1.
शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे /विमा हाप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे / शेतकऱ्यांनी ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक
पहिल्या वर्ष : 31 जुलै 2020
दुसऱ्या वर्षी : 15 जुलै 2021
तिसऱ्या वर्षी:15 जुलै 2022
पहिल्या वर्षी : 30 नोव्हेंबर 2020(रब्बी ज्वारी) 15 डिसेंबर 2020 (गहू बा. हरभरा, कांदा व इतर पिके) 31मार्च 2021 (उन्हाळी भात, उन्हाळी भूईमुग)
  दुसऱ्या वर्षी : 30 नोव्हेबर 2021 (रब्बी ज्वारी) 15 डिसेंबर 2021 (गहू बा. हरभरा, कांदा व इतर पिके) 31 मार्च 2022 (उन्हाळी भात, उन्हाळी भूईमुग)
तिसऱ्या वर्षी : 30 नोव्हेंबर 2022 (रब्बी ज्वारी) 15 डिसेंबर 2022 (गहू बा. हरभरा, कांदा व इतर पिके) 31 मार्च 2023 (उन्हाळी भात, उन्हाळी  भूईमुग )
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर
खरीप हंगाम सन 2020
अ.क्र.
पिक
जोखीम स्तर
(टक्के)
विमा संरक्षित रक्कम रुपये
शेतकरी हिस्सा / प्रति हे. रक्कम रुपये
विमा कंपनीचे नांव व पत्ता
1.
खरीप ज्वारी
70
23000
460
भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स  कंपनी लि.
विभागीय कार्यालय मिलेनियम स्टार बिल्डींग, तिसरा मजला, ढोले पाटील रोड, रुबी हॉल क्लिनिकजवळ पुणे 411001
जिल्हा प्रतिनिधी नागेश बुडीडा
Mo no- 63021 16732
टोल फ्री क्रमांक 18001037712
कॉपोरेट कार्यालय पत्ता-
19 वा मजला, पारीनी क्रेसेंटो, जी ब्लॉक,  बीकेसी, मुंबई 400051 ई-मेल customer. service@bhartiyaexe. com
2.
बाजरी
70
16500
330
3.
भुईमूग
70
17500
350
4.
सोयाबीन
70
34000
680
5.
मुग
70
18000
360
6.
उडीद
70
19000
380
7.
तूर
70
27500
550
8.
कापूस
70
22000
1100
9.
मका
70
  5500
110
10
कांदा
70
55000
2750
रब्बी हंगाम 2020-21
1.
गहू बा
70
31000
465
2.
ज्वारी बा
70
28000
420
3.
ज्वारी जि
70
22000
330
4.
हरभरा
70
17500
262.50
5.
उ.भुईमूग
70
30000
450
6.
र.कांदा
70
55000
2750

1.प्रधानमत्री पिक विमा योजनेत सहभागी  होणेसाठी डि.सी.सी. बॅक व राष्ट्रीयकृत बॅक तसेच जनसुविधा केंद्राद्वारे किंवा शेतकरी पिक विमा  पोर्टलवर (www.pmfby.gov.in) अर्ज करु शकतात.
2. शेतक-यांचे  अर्ज, विमा हप्ता जनसुविधा केंद्रावर  नि: शुल्क भरण्याची सुविधा करण्यात आली आहे.
3. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची तसेच चक्रीवादळ, वादळी पाऊस व अवेळी पाऊस यामुळे कापणीनंतर शेतात वाळविण्याकरीता ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास
त्याबाबतची माहिती 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनी, कृषि विभाग यांना देणे आवश्यक आहे.
कर्जदार शेतक-यासाठी पिक विमा योजना ऐच्छिक आहे. यासाठी शेतक-यांनी योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणा पत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बॅंकेला देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांचा सहभाग बंधनकारक समजण्यात येईल.अधिक माहितीसाठी शेतक-यांनी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. शेतक-यांनी पिक विमा भरताना आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टी करारनामा / सहमतीपत्रक, पिक पेरणी स्वयं घोषणापत्र आणि बॅकेच्या पासबुकाची प्रत सादर करुन इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पिक विमा भरताना शेतकऱ्यांनी बॅंकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक इ. खातरजमा करावी, असे आवाहन श्री. बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments