पीक कर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रार जिल्हाधिकारी शंभरकर यांचा शासकीय नियमानुसार कर्ज न देणाऱ्या बँकांविरुध्द पवित्रा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 1, 2020

पीक कर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रार जिल्हाधिकारी शंभरकर यांचा शासकीय नियमानुसार कर्ज न देणाऱ्या बँकांविरुध्द पवित्रा

पीक कर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रार

जिल्हाधिकारी शंभरकर यांचा शासकीय नियमानुसार कर्ज न देणाऱ्या बँकांविरुध्द पवित्रा


सोलापूर, दि.1(क.वृ.): पीक कर्जाचे शासकीय नियमानूसार वितरण न करणाऱ्या बँकांविरुध्द पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.
सध्या पेरणीचा हंगाम सुरु आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. पण बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द पोलीस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तक्रार नोंदवण्याची कारवाई केली जाईल, असे श्री शंभरकर यांनी सांगितले.
याबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सांगितले की, खरीप हंगाम सुरु होऊन सुमारे एक महिना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यास एकूण 1438.52 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 30 जूनअखेर 648.88 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जूनअखेर पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 45 टक्केच वाटप झाले आहे. हे वाटप जास्तीत जास्त व्हावे, यासाठी बँकाकडे पाठपुरावा केला जात आहे.  याबाबत उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्राद्वारे सूचना दिली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया यासह काही  प्रमुख बँकांचा समावेश आहे. त्याचवेळी आयसीआयसीआय बँकेने 166.26 टक्के तर एचडीएफसी बँकेने 99.46 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील पीक कर्ज वितरण
कर्जवाटप तपशील
राष्टीयकृत बँका
खासगी बँका
जिल्हा बँक
व्हीकेजीबी
बँकाच्या शाखा
233
59
208
35
खातेदार उद्दिष्ट
69505
10605
22081
7281
कर्ज वाटप उद्दिष्ट
105969
18286
15457
4140
तीस जून अखेर कर्जवाटप
27544.03
21128.1
13738.35
2478.09
उद्दिष्टांची टक्केवारी
25.99
115.54
88.88
59.86
    (खातेदार संख्या प्रत्यक्ष आणि आकडे लाख रुपयांत)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages