Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरेगाव येथे मल्लिकार्जून प्रशालेचा 94.11 टक्के निकाल

बोरेगाव येथे मल्लिकार्जून प्रशालेचा 94. 11 टक्के निकाल 


सोलापूर दि.३१(क.वृ.)(देविदास माने): अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे श्री मल्लिकार्जुन प्रशाले चा दहावी निकाल यंदा 94. 11 टक्के इतका लागला आहे. या परीक्षांमध्ये एकूण विद्यार्थी 51 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यापैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रशालेतील  कु स्नेहा सिमाजी पवार हिने 90.80 टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविली तर स्वाती बसवणप्पा दुलंगे हिने 88.60 टक्के व्दितीय तर सिद्धाराम मल्लिनाथ पाटील यांनी 87.40 टक्के घेऊन तिसरा क्रमांक प्राप्त केला.  11 विद्यार्थिनी विशेष प्राविण्य मिळविले. प्रथम श्रेणीतून 18 द्वितीय श्रेणीतून  16 तृतीय  श्रेणीतून  3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष धर्म रत्न डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी , संस्थेचे सचिव श्री शांतया स्वामी , धडाडीचे सरपंच श्री उमाकांतजी गाढवे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रेवणसिद्ध रोडगीकर , यांच्यासह शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन केले
Reactions

Post a Comment

0 Comments