Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्याकारणाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 18 येथे फिवर ओपीडी

     सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्याकारणाने कोरोनाचा         प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 18 येथे फिवर ओपीडी 
                 महापौर श्रीकांचना यन्नम यांनी भेट दिली 



                   सोलापूर-- सोलापूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्याकारणाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 18 येथे फिवर ओपीडी तसेच रॅपिड अटींजन टेस्ट करण्याचे आयोजन करण्यात आले होते याठिकाणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी भेट दिली तसेच या ठिकाणी फिव्हर ओपीडी मध्ये आणि रॅपिड अटींजन टेस्ट या संदर्भात माहिती घेतली तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती असल्यास त्यांनी या फिव्हर ओपीडी मध्ये येऊन तपासणी करून घ्यावे तसेच वयस्कर व्यक्तींनी त्या ठिकाणी रॅपिड अटींजन टेस्ट करून घ्यावे जेणेकरून त्यांचा रिपोर्ट लगेच मिळेल.आणि पुढील उपचार करण्यास मदत होईल. प्रभागामध्ये एकूण 2200 रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून त्यापैकी सध्या 600 रॅपिड अटींजन टेस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये 22 व्यक्ती हे हे पॉझिटिव्ह आढळून आले असून महापालिकेच्या वतीने पुढील उपचार करण्यासाठी नेण्यात आले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी व सोलापूर शहरातील तमाम नागरिकांनी महापालिकेस तसेच पोलिस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.यावेळी नगरसेवक शिवानंद पाटीलव प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments