संचारबंदी काळात 18 गावातील रस्ते वाहतूक बंदअत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते
सोलापूर,दि.१७(क.वृ.): सोला पूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता 16 जुलै ते 26 जुलैदरम्यान 10 दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 7 अशा 18 गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
ग्रामीण भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 10 दिवस 30 गावात संचारबंदी लागू केली आहे. या काळात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, गावातील लोक इतर गावात जावू नयेत आणि त्या गावात बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये, यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत, असे श्री. पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
बंद करण्यात आलेले रस्ते आणि पर्यायी रस्ते खालीलप्रमाणे:
अ.क्र.
|
गावाचे नाव
|
बंद करण्यात येणारे रस्ते
|
पर्यायी रस्ते
|
1.
|
मार्डी
|
मार्डी ते कारंबा रस्ता
|
मार्डी ते अकोलेकाटी फाटा बार्शी रोड.
|
2.
|
नान्नज
|
नान्नज ते मार्डी
|
नान्नज ते अकोलेकाटी फाटा बार्शी रोड ते मार्डी.
|
3.
|
बाणेगाव
|
बाणेगाव ते कारंबा
|
बाणेगाव ते भोगाव-सोलापूर रोड
|
4.
|
बोरामणी
|
बोरामणी ते संगदरी
|
संगदरी ते तांदूळवाडी मार्गे सोलापूर.
|
5.
|
तिऱ्हे
|
तिऱ्हे ते पाथरी
|
पाथरी ते बेलाटी सोलापूर
|
6.
|
नान्नज
|
नान्नज ते बीबीदारफळ
|
बीबीदारफळ ते अकोलेकाटी-सोलापूर रोड.
|
7.
|
कोंडी
|
कोंडी ते गुळवंची
|
कोंडी ते सोलापूर रोड.
|
8.
|
बक्षीहिप्परगा
|
बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा
|
बक्षीहिप्परगा ते दहिटणे-सोलापूर.
|
9.
|
पाकणी
|
पाकणी ते शिवणी
|
शिवणी ते हिरजमार्गे सोलापूर आणि पाकणी ते सोलापूर.
|
10.
|
कासेगाव
|
सोलापूर ते तुळजापूर महामार्गापासून कासेगाव जाणारा रस्ता
|
कासेगाव ते उळे मुख्य रस्ता.
|
आपत्कालीन प्रसंगी, अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा आणि शासनाने परवानगी दिलेल्या सेवा-सुविधा पुरविणाऱ्या आस्थापनांच्या वाहनांसाठी 10 पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहील.
0 Comments