सोलापूर जिल्ह्यात जनावरांचे बाजार सुरू करण्याची डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची मागणी
अकलूज(क.वृ.): लॉकडाऊनमुळे राज्यात जनावरांचे बाजार बंद असल्याने गाई, बैल म्हैस शेळी मेंढीच्या खरेदी-विक्री पुर्णता बंद आहे त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जनावरांचा बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाअधिकारी श्री.मिलींद शंभरकर साहेब यांचेकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यात मागील वर्षी खरीप व रब्बी हंगाम अतिवृष्टी व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. तसेच सध्याच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाला असुन खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असून सध्या मशागतीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैल आवश्यक आहे. पण बैल बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्याच बरोबर अनेक अल्पभुधारक गोरगरीब शेतकरी व शेतमजुर तसेच मेंढपाळ हे छोट्या मोठ्या प्रमाणात शेळी मेंढी पाळत असतात त्यावर त्यांचे बरेचसे आर्थिक नियोजन होत असते अशा परिस्थितीत शेतक-याचे मालाला दर नाही शेतमजुराला काम नाही यावेळी शेळी मेढी अथवा गाई,बैल म्हैस इत्यादी विकुन या अडचणीच्या काळात संसाराला मदत होईल पण जनावरांचे बाजार बंद असलेने योग्य किमतीत जनावरांची खरेदी विक्री होत नाही जनावरांचा बाजार चालू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शेजारच्या पुणे जिल्ह्यातील जनावरांचे बाजार चालू आहेत सबब सोलापूर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार सुरक्षित अंतर राखून चालू करणे बाबतचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी मेल द्वारे केली आहे.
0 Comments