Hot Posts

6/recent/ticker-posts

गोळीबारात व्यापारी जखमी

गोळीबारात व्यापारी जखमी


कुर्डुवाडी(क.वृ.) :दुकान बंद करून रक्कम घेऊन घरी जात असलेल्या व्यापाऱ्यावर मोटरसायकल वरून आलेल्या तिघांनी फायरिंग केल्याने व्यापारी जखमी झाला.ही घटना कुबेर मंगल कार्यालया समोर टेंभुर्णी रोड कुर्डुवाडी येथे घडली.प्रवीण उर्फ बंडू काशीनाथ ढवळसकर असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार प्रवीण ढवळसकर हे टेंभुर्णी रोडवरील दुकान बंद करून घरी जात असताना काळे कपडे परिधान केलेल्या तीन मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला या दरम्यान झालेल्या झटापटीत जवळ असलेल्या शस्त्राने फायरिंग केली.उजव्या हाताच्या खांद्या खाली गोळी लागून जखमी झाले प्रवीण यांचे बंधू विश्वनाथ ढवळसकर हे मागे धावल्याने लुटारूनी पोबारा केला.प्रवीण यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
Reactions

Post a Comment

0 Comments