Hot Posts

6/recent/ticker-posts

उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचे मेथवडे येथे पाणीपूजन

उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचे मेथवडे येथे पाणीपूजन.



सांगोला(क.वृ.) सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच टेंभूचे उन्हाळी आवर्तन तालुक्याला मिळाले असून सदर अवर्तनाचे पाणी सांगोला तालुक्यातील माणनदीच्या शेवटच्या 
टोकापर्यंत म्हणजे मेथवडे बंधारा पर्यंत    प्रथमच उन्हाळी आवर्तनातुन पूर्ण क्षमतेने पाणी पोहचले  असल्याने याचे औचित्य साधून  काल रविवार दि.21 जून रोजी आ. शहाजीबापू पाटील व दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते मेथवडे येथे पाणी पूजन करण्यात आले. सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी त्यांना मिळाले असल्याने माणनदी काठ परिसरातील  शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. 
सांगोला तालुका हा मागील अनेक  वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. तालुक्याने पाण्याच्या नावावर अनेक आश्वासने ऐकली परंतु तालुक्यातील नद्या पाण्याने भरलेल्या बघणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले नाही. वरुणराजाची साथ नसल्याने भर पावसाळ्यात देखील तालुक्यातील नद्यांना पाणी दिसत नव्हते. परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या हक्काच्या सर्व योजनांचे पाणी तालुक्याला आणण्यास सुरुवात केली असल्याने टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सांगोला तालुक्याला मिळवून घेतले असून सदरचे पाणी हे माणनदीच्या  शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मेथवडे बंधारा पर्यंत पूर्ण क्षमतेने  यशस्वीरित्या पोहोचले आहे. 
टेंभू योजनेच्या सदरच्या पाण्यासाठी  सांगोला तालुक्यांमध्ये अनेक आंदोलने झाली. यामधील लक्षवेधी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसह तब्बल 28 दिवस तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. जनावरांसह शेतकरी 28 दिवस तहसील कार्यालया समोर उभे असताना देखील टेंभू योजनेचे पाणी 17 गावातील शेतकऱ्यांना  मिळवून देण्यात  यश मिळाले नाही. परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच वर्षी सांगोला तालुक्याचे सदरचे हक्काचे पाणी मिळवून देऊन  बलवडी, नाझरे, वझरे, अनकढाळ, वाटंबरे , यलमर मंगेवाडी, कमलापूर, अकोला वासुद, कडलास, वाढेगाव, बामणी, मांजरी,सावे,  देवळे, मेथवडे, या गावातील शेतकऱ्यांना या उन्हाळी  अवर्तनामुळे मोठा फायदा होणार आहे. 
सांगोला तालुक्यासाठी हक्काचे असणारे सर्व पाणी या पुढील काळात देखील शेतकऱ्यांना मिळवून दिले जाईल. तालुक्याच्या हक्काचे पाणी हे शेतकऱ्यांच्या हक्काचे असल्याने शेतकऱ्यांपासून तो अधिकार कधी हिरावून घेतला जाणार नाही असे आश्वासन यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते दीपक आबा साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, तानाजी काका पाटील, प्राध्यापक संजय देशमुख, पांडुरंग मिसाळ, जगदीश पाटील यांचा सह  शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments