Hot Posts

6/recent/ticker-posts

चव्हाणवाडी येथील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान

चव्हाणवाडी येथील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान



टेंभूर्णी (क.वृ.):- माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येेेेथे कोरोना रोगाचे पाश्वभुमीवर संपुर्ण राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असल्याने गावातील ग्रामस्थांच्या आवाहनाला मोठया प्रमाणात युवा वर्ग व महिलांनी प्रतिसाद दिला.
सुरक्षित अंतर ठेवून स.म.शंकरराव मोहिते-पाटिल ब्लड बँक अकलूज व चव्हाणवाडी (टे) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विध्यमाने रक्तदान शिबिराचे रविवार दिनांक २८/०६/२०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ८ महिला व ४२ पुरुष अशा ५० जणांनी शिबिरात रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासाठी डाॅ.राजेश चंकेस्वर, डाॅ.तुषार साबळे, डाॅ.चंद्रकांत गायकवाड, डाॅ.अनिल लोखंडे ग्रामस्थ ज्ञानेश्वर मिस्कीन, नवनाथ शिंदे, राजेंद्र कदम, मनोज नांगरे सर, राहुल चव्हाण, हनुमंत इंदलकर पाटील, संग्राम चव्हाण, नवनाथ नांगरे सर, डॉ.शाम नांगरे, जमाल काझी, सुनील चव्हाण, संग्राम नांगरे, भाऊसाहेब इंदलकर, तात्यासाहेब सलगर, जोतिराम चव्हाण, वैभव नांगरे, चंद्रकांत आलदर, सुधीर नांगरे, अतुल भोसले, अनुप मिस्कीन, नितीन चव्हाण, समाधान नांगरे, अनिल जगताप,आमोल भोसले  आदिजणांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.
या शिबिरात रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे गावातील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments