Hot Posts

6/recent/ticker-posts

खाजगी रुग्णालयात जादा शुल्क आकारल्यास करा तक्रार- जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केल्या ग्रामीण आणि शहरासाठी समितीची स्थापना


खाजगी रुग्णालयात जादा शुल्क आकारल्यास करा तक्रार-

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केल्या ग्रामीण आणि हरासाठी समितीची स्थापना 



सोलापूर,(क.वृ.)- खाजगी रुग्णालये रुग्णांकडून उपचार नियंत्रित दरापेक्षा जादा शुल्क आकारणी करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार ग्रामीण आणि सोलापूर शहरासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
समितीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपचार नियंत्रण दर व अवाजवी शुल्क आकारल्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी समिती
अध्यक्ष म्हणून लेखाधिकारी स्थानिक निधी व लेखापरीक्षण विभाग धनराज पांडे (7588546013), सदस्य म्हणून  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले (9423075732), तहसीलदार श्रीमती उज्ज्वला सोरटे (8329837650), सदस्य सचिव म्हणून आरोग्य अधिकारी संतोष नवले (9326874228).
सोलापूर ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी समिती
अध्यक्ष म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत (9823226501), सदस्य म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले (9423075732), प्रकल्प अधिकारी श्री.नवाले (9422042255 ), सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार (9175420566).
Reactions

Post a Comment

0 Comments