ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणी
अकलुज(क.वृ.):अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत(नाना) शिवदास कुंभार यांची विधान परिषद सदस्य म्हणून राज्यपाल कोट्यातून नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हातील पत्रकारांतुन होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार हे १९८२ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. १९८२ ते आजतागायत त्यांनी वैचारिक पत्रकारिता करीत तमाम विषयांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकारी, राजकीय, आदी क्षेत्राच्या बातमीवर त्यांनी आपल्या लेखणीचे कौशल्य दाखवले आहे. विचारवंत लेखणी, उत्कृष्ट संवाद कौशल्य, उत्कृष्ट विचारसरणी, कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कृष्ट स्मरणशक्ती, सृजनता, मनमिळावूपणा अशा विविध पैलूमुळे चंद्रकांत कुंभार यांच्या सान्निध्यात तमाम पत्रकार घडले. तर याच कारणास्तव ते प्रत्येक क्षेत्रामध्ये कौतुकाचे आणि आदराचे स्थान ठरले. तर त्यांची विचारवंत लेखणीही श्रेष्ठ आणि आदर्शवादी ठरत गेली.
चंद्रकांत कुंभार हे लेखणीच्या माध्यमातून वास्तववादी विषयांना न्याय देताना त्यांनी धारदार लेखणीचा आधार न घेता, वैचारीक आणि आधार असणाऱ्या लेखणीचा अधिक वापर केला. म्हणून गेले ३८ वर्षानंतरही त्यांची लेखणी अत्यंत प्रामाणिकपणे उभारी घेताना दिसते. पत्रकार कुंभार हे विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करीत असताना त्यांनी वीर शिवलिंग समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे. सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तर सोलापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. तसेच साईबाबा मंदिर ट्रस्ट म्हणूनही ते काम पाहताना दिसत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुजच्या लावणी स्पर्धेत त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली. पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत कुंभार म्हणाले की सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवलिंग मठपती यांनी फोनद्वारे राज्यपाल नियुक्ती विधान परिषदेसाठी मागणी पत्र देण्याचे सांगितले आहे. तर विजयदादा हे आमचे नेते असून, राजकीय आदर्श आहेत. विजयदादा जिथे असतील तिथे आम्ही आहे. विजयदादांनी संमती दिल्यास त्यांचे मार्गदर्शनानुसार मागणी पत्र देऊ असे ते म्हणाले.
राज्यपालांकडून लवकरच विधान परिषदेसाठी १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. राज्यपालांच्या कोट्यातून पत्रकार, विचारवंत, साहित्यिक, कलावंत यांची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आणि परंपरा आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी पत्रकार बांधव करीत आहेत.
0 Comments