लोकमंगल बँकेतर्फे बचत गटातील महिलांना धान्य वाटप
सोलापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजगाराची संधी नसल्याने बर्याच नागरिकांना आर्थिक समस्येस तोंड द्यावे लागले आहे. त्यांना मदत व्हावी व कोणाचीही उपासमार होऊ नये यासाठी लोकमंगल बँक व लोकमंगल फाऊंडेशनतर्फे बचत गटातील महिलांना आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते अन्नधान्य किट तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दिनकर देशमुख आदी उपस्थित होते. आ. देशमुख म्हणाले, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हा काळ कसोटीचा असला तरी एकमेकांच्या मदतीने व सहकार्याने या संकटाचा सामना केल्यास हे संकट दूर होईल. लोकमंगल बँक आणि फौडेशनतर्फे शक्य तितकी मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी जवळपास याबद्दलचे मार्गदर्शन याप्रसंगी केले. सोलापूर शहरातील जवळपास 2000 गरजू कुटुंबांना मदत देण्यात आली.
0 Comments