Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय बडवे यांची मुख्यमंत्री निधीस ३१ हजार रुपये मदत जाहीर

पंढरपूर नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय बडवे यांची मुख्यमंत्री निधीस ३१ हजार रुपये मदत जाहीर 


कोरोनाच्या विरोधात राज्यभरात डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचारी,पोलीस प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणा निकाराची लढाई लढत असताना राज्यभरातून मुख्यमंत्री निधीस मदत करण्यासाठीही अनेक हात पुढे येत आहेत.पंढरपूर नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी व कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे यांनी मुख्यमंत्री निधीस आपल्या सेवानिवृत्ती वेतनातून ३१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. 
      या बाबत अधिक माहिती देताना दत्तात्रय बडवे म्हणाले कि,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय तळमळीने सध्याच्या कठीण परिस्थिती जनतेसाठी करीत असलेले कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे.अशा वेळी प्रत्येक नागरिकाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तन मन धनाने उभारणे हे आपले कर्तव्य आहे हे ओळखून मुख्यमंत्री निधीस माझ्या सेवानिवृत्ती वेतनातून ३१ हजार रुपये रक्कम मी देणार आहे.पंढरपूर नगर पालिकेकडून मला देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनातून एकवट ३१ हजार रुपये मुख्यमंत्री निधीस देण्यात यावेत अशी विनंती मी मुख्याधिकारी पंढरपूर याना केली आहे.व सदर रक्कम दरमहा अडीच हजार प्रमाणे माझ्या निवृत्तिवेतनातून कपात करावेत अशी विनंती केली आहे
Reactions

Post a Comment

0 Comments