कोरोना जनजागृतीसाठी अशोक कामटे संघटनेचा उपक्रम .
शहर व परिसरात विविध फलकाद्वारे संदेश .
सांगोला :- सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संस्था व श्रीराम डिजिटल, सांगोला यांच्या सौजन्याने कोरोना बाबत जनजागृती फलक अभियान सामाजिक बांधिलकी जोपासून शहरातील वेगवेगळ्या भागात राबविण्यात आले .
कोरोना विषाणूंचा प्रादुभार्व टाळण्यासाठी अनेक फलक संघटनेच्या सद्यास्नी लावले .यामध्ये
लॉक डाउन मध्ये घरात सुरक्षित रहा ,सानिटीझरचा वापर करा ,लोकांनी सोशल डिस्टंसिन्गचा नियम पाळावेत ,आवश्यक काम व गरज असेल तरच घराबाहेर पडा .यासह नागरिकांच्या अनेक सूचना व विनंतीचे आहवहन या माध्यमातून शहीद अशोक कामटे संघटनेने केले आहे .हि बॅनर्स विविध चौकात लावल्याने हे संदेश लक्षवेधी ठरत असुन यांचा लोकांवर निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल .येणार्या काळात विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे असे आहवाहन जनहितार्थ याद्वारे शहीद अशोक कामटे बहूद्देशीय संघटनेमार्फत करण्यात येत आहे .
0 Comments