Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू

कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू



            पुणे, दि.7: पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 1 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोविड-19 चाचणी पॉझीटीव्ह झाली होती.
        येथील कोरोना पॉझीटीव्ह 65 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला 4 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
       पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह  67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी 11.30 वाजता मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा  त्रास होता तसेच न्युमोनिया व किडणी निकामी झाली होती.  तसेच  या रुग्णाच्या मेंदुला सूज आली होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments