लॉकडाउनमध्ये विषमतेची जाणीव : अभ्यंकर
ऑनलाईन व्याख्यानमालेला प्रतिसाद
सोलापूर : सध्या देशात कोरोनाची महामारी सुरू असताना ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच लॉकडाउनमधील देशात श्रमिक वर्गाला होणारी विषमतेची जाणीव नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण अवलंबण्याची खरी आज देशाला गरज असल्याचे मत प्रा. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
लोकमंगल फाउंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट संचलित लोकमंगल जीवक हॉस्पिटल व संशोधन केंद्र यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. अजित अभ्यंकर यांनी गुंफले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून व त्यांच्या जीवनकार्यातून देशाची आर्थिक घडी बसविले पाहिजे. देशाचे 60 टक्के राष्ट्रीय उत्पन्न हे छोटे उत्पादकांसह असंघटित वर्गावर खर्च करावा. जेडीपीचे 5 टक्के रक्कम कोरोनासाठी खर्ची टाकण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. छोटे उत्पादकांसह इतर असंघटित वर्गावर खर्च करावा. तसेच शेतकर्यांची पिके त्याच मातीत पुन्हा पेरली गेली आहेत. लॉकडाउनची रचना करता या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुसर्या शहरांमध्ये अडकलेले मजूर त्यांच्यासाठी ताबडतोब आर्थिक मदत, अन्नपुरवठा सुरू करण्यात यावी. अनेक अटींची शिथिल करून मदत दिली पाहिजे. सगळी अर्थव्यवस्था बंद असताना सध्या सुरू असलेला एकमेव सट्टा बाजारामुळे विक्रीचा उद्रेक झाला आहे. गुंतलेल्या पैशाच मूल्य खाली उतरले. यातून बँका अडचणीत येऊ शकतात. विविध फंड अडचणीत येऊ शकतात. या सर्व अर्थव्यवस्थेची रचनाही योग्य पध्दतीने झाले पाहिजे, असेही अभ्यंकर म्हणाले.
लोकमंगलच्या ऑनलाईनव्याख्यानमालेप्रसंगी 926 प्रेक्षक - गेल्या 9 वर्षांपासून लोकमंगल फाउंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट संचलित लोकमंगल जीवक हॉस्पिटल व संशोध केंद्र यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुंफले. या ऑनलाईन व्याख्यानाचे 926 व्हिवर असून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment