डॉक्टरांना लवकरात लवकर सरंक्षण कीट उपलब्ध करू: आ. देशमुख
सोलापूर सोशल फाऊंडेशन च्या कॉल कॉन्फरन्स मध्ये आ. देशमुख यांनी डॉक्टरांशी साधला संवाद
सोलापूर : दवाखाने ही आरोग्याची मंदिरे तर डॉक्टर मंडळी माणसाच्या रूपातील देवदूत आहेत. त्यांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे त्यांना कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लवकरात लवकर संरक्षण कीट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले.
आ. देशमुख यांनी रविवारी कॉल कॉन्फरन्सद्वारे शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांची संवाद साधला. त्यावेळी अनेक डॉक्टरांनी आपण कोरोना व्हायरसशी लढ़ण्यासाठी तयार आहोत मात्र आपल्याला पीपीई कीट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते. आमदार देशमुख म्हणाले की, सोलापुरातील एका गारमेंट कंपनीला पीपीई किट तयार करण्यास सांगितले आहे, त्याचे सॅम्पल ही तयार झालेले आहे, लवकरात लवकर मागणीप्रमाणे ते सर्व हॉस्पिटल आणि डॉक्टरांना पुरविण्यात येईल. या कॉल कॉन्फरन्स मध्येेे अनेक डॉक्टरांनी कोरोना बद्दल केवळ सरकारवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतःही मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, हे उपाय करावेेेेत असे सांगितले तर काही डॉक्टरांनी कोरोनाबाबतीत शहरातील उत्सव प्रेमी नेत्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे सुचवले. मोहोळ येथील डॉक्टर दिलीप गाडे यांनी सर्व हॉस्पिटलला सनीटायझर होलसेल रेट ने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. या कॉल कॉन्फरन्स मध्ये डॉक्टर समाधान थोरात, डॉक्टर शिवराज सरतापे, डॉक्टर विष्णुपंत गावडे, डॉक्टर सविता फाळके, डॉक्टर सुनील गायकवाड, डॉक्टर जयंत गोलवलकर, डॉक्टर तुषार म्हात्रे, डॉक्टर पंडित माळी, डॉक्टर श्रीकांत पाटील, डॉक्टर दिलीप गाडे यांच्यासह अनेकांनी संवाद साधत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.
खाजगी डॉक्टर आणि दवाखाने बंद ठेवू नयेत
रुग्णांनीही स्वतःची आरोग्याची खरी लक्षणे सांगावी जेणेकरून डॉक्टरांना उपचारासाठी व स्वतःच्या सुरक्षेसाठी अडचण येणार नाही. मेडिकल क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचं योगदान समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टर व स्टाफ साठी सुरक्षा किट आणि इतर सुरक्षा व उपचार साधनांची उपलब्धता तात्काळ करून द्यावी. खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवतात ते सुरू करावेत.ही लढाई मोठी असली तरी आपली हिम्मत अजिबात छोटी नाही,आपण नक्की जिंकणार आहोत;फक्त आत्ताची लढाई हिंमतीने लढायला हवी, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले.
0 Comments