पत्रकार संरक्षण समिती पंढरपूरच्या पत्रकारांना जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी) :- पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना आज जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तुर दाळ, हरभरा दाळ, पोहे, मेडीमिक्स साबण, गोडे तेल, मीठ, खोबरेल तेल, चहा पावडर, शेंगदाणा, रवा व सॅनेटायझर, मसुर दाळ, गहु, तांदुळ असा किराणा माल व अत्यावश्यक वस्तु देण्यात आल्या.
यासाठी व्हीएनएस ग्रुपचे संतोष वायचळ, चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक नागेशदादा फाटे यांनी यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत केली तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचे वतीने 75 किलो गहु व 75 किलो तांदुळ देण्यात आले. मनसेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दिलीपराव धोत्रे यांचेकडून गहु, तांदुळ, साखर, चहा पावडर असे स्वतंत्र कीट देण्यात आले.
आज व्हीएनएस ग्रुपचे व्यवस्थापक राजुभाई मुलाणी, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख समाजसेवक ओंकार बसवंती, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ.आरती बसवंती यांच्या हस्ते शिवयोगी मंगल कार्यालय लिंक रोड, पंढरपूर येथे सोशल डिस्टन्स राखुन हे वितरण करण्यात आले. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर कार्याध्यक्ष झाकीर नदाफ, अध्यक्ष श्रीकांत कसबे, उपाध्यक्ष तानाजी जाधव, खजिनदार अशोक पवार, प्रसिध्दीप्रमुख संजय हेगडे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी पत्रकार विरेंद्रसिंह उत्पात, जैनुद्दीन मुलाणी, संतोष कांबळे, शंकर पवार, शंकर कदम, लक्ष्मण जाधव, धीरज साळुंखे, उमेश टोमके, गौतम जाधव, नंदकुमार देशपांडे, अशोक पवार, लखन साळुंखे, तानाजी सुतकर, डॉ.शिवाजी पाटोळे, आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. याचा परिणाम सर्वांच्याच दैनंदीन जीवनमानावर घडलेला आहे. या काळात पत्रकार बांधवांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत. पत्रकार बांधवांना कांही अंशी दिलासा मिळावा यासाठी दैनंदीन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तुंचे पहिल्या टप्प्यातील वाटप आज करण्यात आले. कांही दिवसांनी दुसर्या टप्प्यात आणखी वाटप करण्यात येईल अशी माहिती यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी दिली. पत्रकार बांधवांनी आपले काम करताना स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क, सॅनेटायझर्सचे वापरासह सोशल डिस्टक्शनचा अवलंब करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 Comments