जनता कर्फ्यूमुळे अकलूजच्या पंचक्रोशीत सन्नाटा...
अकलूज( प्रतिनिधी )- माळशिरस तालुक्यातील गावागावातील दक्षता समितीने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी माळशिरस तालुक्यात एक दिवसीय जनता कर्फ्यू राबविण्यात आला असून अकलूजच्या पंचक्रोशीत सन्नाटा पसरला होता.
कोरोनारुपी क्रूर राक्षसाने जगाच्या पाठीवर थैमान घातले आहे. अखंड जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूचे आक्रमण आणि आक्रमकता पाहता त्याने माणसामाणसाचे जीवन उध्वस्त केले आहे तर अनेकांचे जीवन संपवले आहे. महाभयंकर अशा विषाणूला मुळापासून संपविण्यासाठी देश लॉक डाऊन करण्यात आला तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून आपले शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा रात्रंदिवस उपाययोजना करीत आहेत.तर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वचजण घरात बसूनच आलेल्या संकटाचा सामना करीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातला कोरोनाचा शिरकाव पहाता या संकटावर मात करण्यासाठी व त्याचा सामना करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समितीने आपल्या कर्तव्यात कसलीही कसर सोडलेली नाही. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी माळशिरस तालुक्यात १९ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या कर्फ्यूला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे, अकलूजच्या पंचक्रोशीतील सन्नाटा पसरला होता.
0 Comments