Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी परीसरातील दारू विक्रेत्यांवर कारवाई - दयानंद गावडे

टेंभुर्णी परीसरातील दारू विक्रेत्यांवर  कारवाई : दयानंद गावडे

टेंभुर्णी : - [प्रतिनिधी ] - टेंभुर्णी पोलिसांनी बंदी आदेश लागू असताना १८ एप्रिल रोजी तीन ठिकाणी धाड टाकून ५ हजार ६४८ रुपयाची देशी दारू व हातभट्टी दारू जप्त करून विक्री करणाऱ्या तीन जणांवर कारवाई केली असल्याची माहीती टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे प्रभारी पो.नि.दयानंद गावडे यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली . ते टेंभुर्णी पो.नि.राजकुमार केंद्रे यांचा आपघात झाल्यामुळे ते प्रभारी तत्पुरता चार्ज घेतल्या त्यांनी पहीलीच पत्रकार परीषद घेतली त्या वेळेस ही माहीती दिली या वेळी त्यांनी सांगीतले की टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे हद्दीतील सर्व किराणादुकाने एक दिवसाड सकाळी  8 ते 2 वाजेपर्यंत चालु राहतील तसेच सर्व दुकानदारांनी मालविक्रीचे बाहेर दर पत्रक लावने बंदन कारक आहे अन्यता कारवाई करण्यात येईल तसेच  टेंभुर्णी शहर परीसरातील शेती दुकाने ही आशीच चालु राहतील. 
              टेंभुर्णी शहरातील भाजी मंडई आठवड्यातुन रविवारी व गुरुवारी चालु राहील आसे सांगितले तसेच विनाकारण फिरणार्यावरती कारवाई चालु राहील असे सांगीतले तसेच आज दिवस भरात वेगवेगळ्या ठिकाणी दारु पकडून ,आरोपी जितू सुरेश भोसले (वय-२५) रा.इंदिरानगर झोपडपट्टी टेंभुर्णी याच्या घरी १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा.धाड टाकली असता जितू भोसले याने विक्री करण्यासाठी घराच्या मागे आणून ठेवलेली १२४८ रु.किमतीची २४ बाटल्या ढोकी संत्रा,८८४ रुपये किमतीची १७ बाटल्या टँगो पंच कं देशी दारू तसेच ४०० किमतीच्या प्लस्टिक ड्रममध्ये ठेवलेली २ हजार ५३२ रुपये किमतीची वीस लिटर हातभट्टी दारू असा दारुसाठा जप्त करून कारवाई केली आहे.पोहेकॉ शिवाजी भोसले हे पुढील तपास करीत आहेत. तर पोकॉ सचिन ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार १८ एप्रिल रोजी ३.३० वा.आरोपी रमेश गणपत पवार (वय-४५) रा.पारधी वस्ती दहिवली ता.माढा येथे धाड टाकली असता त्याने विक्रीसाठी आणून ठेवलेली शंभर रुपये किमतीची पाच लिटर हातभट्टी दारू मिळून आली.याचा तपास पोहेकॉ सुहास क्षिरसागर करीत आहेत.
                  पोकॉ विजय गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,अनिल जगन्नाथ ताकतोडे (वय-४८) रा.अरण ता.माढा याने हायवे पुलाच्या जवळ विक्री करण्यासाठी आणून ठेवलेल्या ८८४ रुपये किमतीचा १७ बाटल्या १८ एप्रिल रोजी धाड टाकून जप्त केल्या आहेत.याचा तपास स.पो.फौ. दत्तात्रय आसबे हे अधिक तपास करीत आहेत.या सर्वांवर दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) नुसार कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार व करमाळा विभागिय अधिकारी विशाल हिरे  व प्रभारी अधिकारी  पो नि दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र मगदूम यांच्या टीमने ही कामगीरी   केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments